नेमका कसा झाला विनायक मेटेंचा अपघात; पोलीस अहवाल TOP NEWS मराठीच्या हाती

668 0

मुंबई: शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचं  अपघाती निधन झाले. मेटे यांच्या गाडीला आज रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.  दरम्यान मेटेंचा नेमका अपघात कसा झाला याबाबत आता पोलीस अहवाल समोर आला आहे.

असा आहे पोलिसांचा अहवाल

अपघात ठिकाण व वेळ : आज दि.13/08/2022 रोजी पहाटे 05.05 वा. चे सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे मुंबई लेनवर किमी नं.km15/900 येथे रसायनी पोलीस ठाणे हद्दीत प्राणांतिक अपघात घडला.

अपघातातील वाहन 1) फोर्ड Endeavour क्र.MH 01 DP 6364

अपघाताचे कारण : नमूद वेळी व तारखेस फोर्ड Endeavour MH 01 DP 6364 चालक एकनाथ कदम हे विनायक मेटे(केज-बीड) यांना घेऊन मुंबई बाजूकडे दुसरे लेनने जात असताना कार चालक यांचा त्यांच्या गाडीवरील त्यांचा ताबा सुटून पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला ठोकर मारून अपघात झाला आहे. सदर अपघातात विनायक मेटे हे अत्यंत गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ आयआरबी ॲम्बुलन्स एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारा कामी दाखल केले असता डॉ.धर्मांग यांनी तपासून मयत घोषित केले आहे. बाॅडीगार्ड पोलिस हवालदार राम ढोबळे हे कारमध्ये अडकल्याने कारमधून बाहेर काढून आय आर बी रुग्णवाहिकेने तात्काळ MGM हॉस्पिटल,कामोठे येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. कार आयआरबी क्रेनच्या साह्याने रस्त्याचे बाजूला घेतली आहे. सदर वेळी आम्ही PSI चव्हाण तसेच रसायनी पोलीस स्टेशन API बालवडकर व स्टाफ तसेच IRBचे नवनाथ गोळे आणि स्टाफ हजर होते. सदर अपघाताची माहिती रसायनी पोलीस स्टेशनला दिली आहे.

मात्र, मेटेंचा अपघात नेमका कसा आणि कोणामुळे झाला याबाबत पोलिसांचे ८ पथक तपास करत आहेत. लवकरच सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील, अशी माहिती पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी दिली.

Share This News
error: Content is protected !!