लडाख येथील अपघातात साताऱ्याच्या फलटण येथील जवान वैभव भोईटे यांना वीरमरण

1192 0

देशसेवा बजावत असताना लडाख येथे जवानांच्या गाडीचा अपघातात 9 जवानांना वीरमरण आले.. त्यामध्ये सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील राजाळे गावचे सुपूत्र वैभव संपतराव भोईटे यांना लडाख मध्ये वीरमरण आले आहे..लडाख मधील लेहजवळ कायरी भागात भारतीय लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघातात त्यांना हौतात्म्य आले असून भोईटे कुटुंबियांसह गावावर शोककळा पसरली आहे.

2018 मध्ये वैभव भोईटे हे आर्मीमध्ये भरती झाले होते. ते विवाहित असून त्यांची पत्नी पोलीस सेवेत कार्यरत आहे. एक लहान मुलगी आहे.
आई, वडील,लहान भाऊ दोन विवाहित बहीण असा परिवार आहे.

लडाखमधील कायरी भागात भारतीय लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. लष्काराचे वाहन दरी कोसळून झालेल्या या अपघातात 9 जवानांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील जवान वैभव भोईटे यांचा समावेश आहे.. तर काही जवान जखमी असल्याचे वृत्त आहे.

अपघातग्रस्त लष्कराच्या ट्रकमध्ये 2 जेसीओ आणि 7 जवान होते. एकूण 34 कर्मचार्‍यांसह एक यूएसव्ही, ट्रक आणि अॅम्ब्युलन्ससह 3 वाहनांची ही रेकी करणारे पथक असल्याची प्राथमिक माहिती आहे.
भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी, सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास लष्कराचा ट्रक अपघातग्रस्त झाला. क्यारी शहरापासून 7 किमी दूर अंतरांवर हा अपघात झाला आहे. जवान असलेला ट्रक दरीत कोसळला. भारतीय जवान कारू गॅरीसनहून सध्या लेहजवळील क्यारीच्या दिशेने जात होते.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide