राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊसाचा हवामान खात्याचा अंदाज

236 0

जुलै महिन्यात पावसाने संपूर्ण राज्यात जोरदार हजेरी लावली काहीशी उघडीप दिल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

येत्या तीन चार दिवसांत मध्यम ते मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होणार असून रविवारी पावसाचा जोर वाढणार आहे.चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांतील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. तर विदर्भातील बाकीचे जिल्हे वाशिम, अकोला, भंडारा, नागपूर, अमरावती, वर्धा, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा आहे. गेल्या 24 तासांत कोकण, गोवा येथे बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने आपली हजेरी लावली.आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, नाशिक धुळे, नंदुरबार, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उद्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, नाशिक, नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणांवर पावसाचा अंदाज आहे.

Share This News

Related Post

KIRIT SOMAIYYA : ” नोएडातील नियमबाह्य इमारती पाडल्या ; मुंबईतील अनधिकृत इमारतींचं काय ? “

Posted by - August 29, 2022 0
मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार रविवारी नोएडा येथील नियमबाह्य ट्वीन टॉवर ही इमारत जमीन दोस्त करण्यात आली . दरम्यान मुंबईमध्ये…
Radhakrishna Vikhe Patil

Contract Recruitment : कत्रांटी तहसीलदार भरतीची जाहिरात अखेर रद्द; महसूलमंत्र्यांनी भरतीबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा

Posted by - October 1, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वी शासनाकडून कंत्राटी (Contract Recruitment) तहसीलदार नियुक्तीबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीवरून राज्यात मोठा गोंधळ…

मनसेच्या वसंत मोरेंचं काम लोकशाहीला साजेसं ; काँग्रेसच्या ‘या’ युवा नेत्यांनं केलं अभिनंदन

Posted by - April 6, 2022 0
पुणे- गुढीपाडव्या दिवशी झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी केलेल्या मशिदींवरील भोंग्यांच्या घोषणेमुळं राजकीय अडचण होत असल्याची खदखद पुण्यातील…
BJP

#PUNE : कोण असणार कसबा मतदार संघाचा उमेदवार ? आज होणार घोषणा ? पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक सुरु

Posted by - January 23, 2023 0
पुणे : दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारीसाठी अनेक साठणिक नेते इच्छुक आहेत. दरम्यान…
Supriya-Sule

#SUPRIYA SULE : मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांना भिगवण रेल्वेस्थानकावर थांबा द्या

Posted by - March 15, 2023 0
दिल्ली : मुंबई ते सोलापूर तसेच पंढरपूर आणि विजापूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना भिगवण रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा, अशी मागणी खासदार सुप्रिया…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *