Heatstroke Death

Heatstroke : मराठवाड्यात उष्माघाताने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

450 0

छत्रपती संभाजीनगर : राज्यात उष्णतेचे प्रमाण खूप वाढले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये याच उष्माघातामुळे (Heatstroke) पहिला बळी गेला आहे. पैठण तालुक्यातील बिडकीनमध्ये ही घटना घडली आहे. गणेश राधेश्याम कुलकर्णी असे उष्माघाताने मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

काय घडले नेमके?
छत्रपती संभाजीनगर जिल्हयातल्या पैठण तालुक्यातील बिडकीन येथे एका खासगी कंपनीत गणेश कुलकर्णी (वय 30) हा तरुण कामाला होता. गणेश हा जैनपूर मार्गाने बिडकीनकडे येत असताना अचानक चक्कर येऊन कोसळला आणि त्याच्या तोंडातून फेस आला. यावेळी त्याला तातडीने बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. मात्रे यांनी गणेशला तपासून मृत घोषित केले.

काळजी घेण्याचे केले आवाहन
राज्यात सध्या संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे उकाड्यातही वाढ होताना दिसत आहे. सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Gas Cylinder : गुडन्यूज! गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कपात

Loksabha Election : वंचितकडून लोकसभेची दुसरी यादी जाहीर; 11 जणांच्या नावांचा समावेश

Share This News
error: Content is protected !!