लोकशाही मराठी न्यूज चॅनेल आयोजित ‘ग्लोबल महाराष्ट्र कोन्क्लेव्ह 2030’ या कार्यक्रमात डेक्कन ग्रुपचे प्रमुख व टॉप न्यूज मराठीचे मुख्य संपादक डॉ. अनिर्बान सरकार यांच्या व्यावसायिक व सामाजिक योगदानाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ग्लोबल महाराष्ट्र पुरस्काराने विशेष सन्मान करण्यात आला. लोकशाही न्यूज चॅनलच्या वतीने आज महाराष्ट्राच्या भविष्याचा वेध घेण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र या भव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डेक्कन ग्रुपचे प्रमुख व टॉप न्यूज मराठीचे मुख्य संपादक डॉ. अनिर्बान सरकार यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘ग्लोबल महाराष्ट्र’ पुरस्कार देऊन विशेष सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. अनिर्बान सरकार यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सन्मानित केलं. डॉ. अनिर्बान सत्यरंजन सरकार यांची उद्योग क्षेत्रात वॉटरमॅन अशी ओळख आहे. वॉटर ट्रीटमेंट क्षेत्रामध्ये त्यांचं अतुलनीय योगदान असून देशातील विविध ठिकाणी सुमारे २५०० सिवेज वॉटर ट्रीटमेंट प्लांटची त्यांनी उभारणी केली आहे. या कंपनीने परदेशातही वॉटर ट्रीटमेंट प्लांट उभारणी केली असून सध्या डॉ. अनिर्बान सरकार हे सौर ऊर्जा प्रकल्पावर काम करत आहेत. तसेच थ्रो या अत्यंत वेगळ्या आणि पेटंट प्राप्त फायर एस्टीन्गिशरची त्यांनी निर्मिती केली असून घरातील आग किंवा कारला लागलेली आग क्षणार्धात विझवता येते.मनोरंजनाच्या क्षेत्रातही डॉ. सरकार यांनी भरीव कार्य केले असून फर्जंद या गाजलेल्या मराठी सिनेमाची त्यांनी निर्मिती केली आहे. लवकरच त्यांची ‘वीर सावरकर सिक्रेट फाईल्स’ ही हिंदी वेबसिरीज नामांकित ओ टी टी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. त्याशिवाय दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांच्या जीवनावर आधारित एका चित्रपटाचं काम काम सुरु आहे. आज त्यांची ग्लोबल महाराष्ट्र या कार्यक्रमात मुलाखत देखील घेण्यात आली.
