कंपनीत कामाला जातो सांगून निघाला, अन् केलं ‘हे’ कृत्य

2370 0

कंपनीत कामाला जातोय, असे घरी सांगून, एका खासगी कंपनीमध्ये काम करण्याऱ्या एका २० वर्षीय युवकाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे . हा प्रकार बुधवारी रात्री नऊ- साडे नऊच्या सुमारास शरणापूर परिसरात उघड झाला आहे. आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव विजय आप्पासाहेब उभेदळ (२० रा. वडगाव कोल्हाटी परिसर) असे असल्याची माहिती दौलताबाद पोलिसांनी दिली आहे.

दौलताबाद पोलिसांनी सांगितले की, विजय हा मंगळवारी रात्री खासगी कंपनीत कामाला जात असल्याचे सांगत घराबाहेर पडला होता. परंतु बुधवारी दिवसभर घरी गेलाच नाही . याच दरम्यान बुधवारी रात्री नऊदरम्यान एका विहिरीत मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली . त्यानंतर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. हि घटना शरणापूर शिवारातील गट क्र. १३ येथे घडली आहे.

त्यानंतर तपास केला असता , तो मृतदेह विजयचा असल्याचे समोर आले. पोलिसांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढत घाटी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. विजयचे वडील अप्पासाहेब उभेदळ यांनी माहिती दिली की , विजय हा रागीट स्वभावाचा होता, किरकोळ वादातून त्याने याआधीही रागाच्या भरात घर सोडले होते. याप्रकरणी दौलताबाद पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस नाईक विठ्ठल सर्जेराव खंडागळे हे करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!