Gunaratna Sadavarte

Manoj Jarange : ‘मनोज जरांगे कुणाची चावी?’, गुणरत्न सदावर्तेंनी थेट नावंच सांगितलं

526 0

मुंबई : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) चांगलेच आक्रमक झाले आहेत. जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत, तसंच फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाण्यासाठी आपण अंतरवाली सराटीहून निघत असल्याचा इशारा जरांगेकडून देण्यात आला.

सदावर्तेंनी साधला जरांगेवर निशाणा
गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मनोज जरांगे महाराष्ट्राला अशांत करण्याच्या भानगडीत आहे. तो राष्ट्रवादीचे वयोवृद्ध पुढारी शरद पवारांची चावी आहे, याची चौकशी झाली पाहिजे. मनोज जरांगे सातत्याने या ना त्या कारणाने वेगवेगळ्या मार्गाने महाराष्ट्राला शाळेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा असताना डिस्टर्ब करतोय. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला डिस्टर्ब करून धमकावतोय. मुंबई आणि महाराष्ट्राला वेठीस धरण्याचा प्रयत्न करतोय’, अशी टीका सदावर्ते यांनी केली आहे.

जरांगेना अटक करण्याची मागणी
‘जालना पोलीस अधिक्षक, मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक या तिघांनाही विनंती आहे, की उच्च न्यायालयाचे आदेश लक्षात घेता याची गुन्हेगारी प्रवृत्ती, कृती लक्षात घेता जरांगेला आहे तिथेच स्थानबद्ध करण्यात यावं. त्यांना बिनापरवानगी रॅली काढायला परवानगी दिली जाऊ नये. जरांगेला अटक करण्यात यावी, कारण तो कायद्यापेक्षा मोठा नाही. जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. देशातला ब्राह्मण असेल किंवा अनुसुचित जाती जमातीमधला माणूस असेल सगळ्यांना सन्मानाने जगण्याची मुभा आहे. जरांगेमुळे जातीय तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे जरांगेला तातडीने अटक करा’, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

IND VS ENG : आर अश्विनने माजी गोलंदाज अनिल कुंबळे यांचा ‘तो’ विक्रम मोडला

Pune News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक पदी श्री. नानासाहेब आण्णाजी तथा सुरेश जाधव यांची निवड

Vitamin ‘P’ : तुमच्या रोजच्या आहारात व्हिटॅमिन ‘P’ का महत्वाचे असते?

Rahul Narwekar : ज्यांच्या फोटोला लोकांनी चपला मारल्या, त्यांना कोण निवडून देणार; खैरेंचा नार्वेकरांना टोला

Manoj Jarange : फडणवीसांचा सलाईनमधून विष देण्याचा डाव; जरांगेंचा खळबळजनक आरोप

Sangli Accident : पोलीस होण्याचं स्वप्न राहिलं अधुरं ! सरावासाठी जाताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Bank Holiday : बॅंकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मार्चमध्ये ‘एवढे’ दिवस बँक राहणार बंद

Kumar Shahani : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कुमार साहनी यांचं निधन

WPL 2024 : शोभना आशाने 5 विकेट्स घेऊन रचला इतिहास

Weather Update : पुढील 3 दिवसांत राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!