मोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई थकबाकीबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो, असं म्हटलं जात आहे.त्यामुळे मोदी सरकार लवकरच या कर्मचाऱ्यांचा प्रलंबित डीए काढणार असल्याची शक्यता आहे.
प्रशिक्षण विभाग आणि वित्त मंत्रालय, खर्च विभाग यांच्या अधिकाऱ्यांसह जेसीएमची संयुक्त बैठक होणार असल्याचं जेसीएमचे राष्ट्रीय परिषदेचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितलं आहे. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या डीएबाबत मोठा निर्णय होऊ शकतो.दरम्यान, निवडणुकीच्या काळात केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या डीए थकबाकीबाबत मोठी अपडेट देऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, 5 राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर आणि होळीपूर्वीच केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना हे मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे.