बारामती (BARAMATI)येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात प्राण गमावलेल्या क्रू अटेंडंट पिंकी माळी(PINKI MALI) यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आला आहे . या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पिंकी यांच्या निधनाने माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, विमान वाहतूक क्षेत्रातूनही शोक व्यक्त केला जात आहे. स्थानिक स्मशानभूमीत त्यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला .
पिंकी माळी (PINKI MALI)या विमान वाहतूक क्षेत्रात क्रू मेंबर (CREW MEMBER)म्हणून कार्यरत होत्या. आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने त्यांनी या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली होती. मात्र, या भीषण अपघाताने त्यांच्या आयुष्याचा प्रवास अर्ध्यावरच थांबवला. पिंकी यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून, परिसरातून एक कर्तबगार मुलगी गमावल्याची भावना व्यक्त होत आहे .
अपघाताचे नेमके तांत्रिक कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या घटनेमुळे विमान प्रवासाच्या आणि प्रशिक्षणार्थी विमानांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. संबंधित विभागाने या अपघाताच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून, लवकरच यामागील सत्य समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.