शेतकरी कामगार पक्ष: मुंबई : बालेकिल्ला असलेल्या रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. जयंत पाटील यांचे बंधू आणि अलिबागचे माजी आमदार पंडीत पाटील यांनी आपल्या हजारो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. (शेतकरी कामगार पक्ष)
भाजपच्या प्रदेश कार्यालयात पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश पार पडला. पंडीत पाटील यांच्यासोबत जिल्हा बँक संचालक, जिल्हा परिषद सदस्य देखील भाजपमध्ये सामील झाले. रायगड जिल्ह्यात आपल्याला मानणारा मोठा वर्ग असून त्याचा भाजपला मोठा फायदा होईल, असा विश्वास पंडीत पाटील यांनी व्यक्त केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पंडीत पाटील काय चीज आहे, ते इतरांना कळेल, असा चिमटा त्यांनी जयंत पाटील यांना काढला. (Peasants and Workers Party of India)
शेकापला फरक पडणार नाही- जयंत पाटील
पंडीत पाटील यांच्या भाजपमध्ये जाण्याने काही फरक पडत नाही. मतदार शेकापसोबतच राहतील, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी व्यक्त केली. पंडीत पाटील हे याआधीच भाजपमध्ये गेले होते, असा टोला त्यांनी लगावला.
पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा
पंडीत पाटील नेमके कोण ?
पंडीत पाटील हे शेकापचे माजी आमदार आहेत. २०१४ मध्ये अलिबाग मतदारसंघातून ते निवडून आले होते. शेकापचे नेते आणि रायगड जिल्हा बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांचे ते धाकटे बंधू आहेत. रायगड जिल्हा हा शेकापचा बालेकिल्ला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अलिबागच्या उमेदवारीवरून पंडीत पाटील आणि जयंत पाटील यांच्यात नाराजी होती.
रायगडमध्ये शेकापला मोठा धक्का
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर शेकापचे नेते जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. मात्र, पंडीत पाटील यांच्यापाठोपाठ जंयत पाटील यांचे भाचे अॅड. आस्वाद पाटील सुध्दा भाजपमध्ये सामील होणार असल्याने शेकापला मोठा हादरा बसला आहे.