महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने(MAHARASHTRA STATE ELECTION राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे सविस्तर वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे. आयोगाच्या घोषणेनुसार, 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार असून, 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीस सुरुवात केली जाईल.
निवडणूक प्रक्रियेची सुरुवात 16 जानेवारीपासून होणार असून, उमेदवारांना 16 ते 21 जानेवारीदरम्यान अर्ज दाखल करता येणार आहेत. दाखल झालेल्या अर्जांची 22 जानेवारी रोजी छाननी करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांना 27 जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत.
मतदान प्रक्रिया 5 फेब्रुवारी रोजी पार पडणार असून, 7 फेब्रुवारीला निवडणूक निकाल जाहीर केला जाणार आहे .आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रशासन, राजकीय पक्ष आणि उमेदवारांवर निवडणूक आयोगाचे काटेकोर नियंत्रण राहणार आहे. ग्रामीण स्वराज्य संस्थांमधील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.