मद्यप्रेमींच्या पदरी निराशा! राज्य सरकारनं घेतला हा मोठा निर्णय

366 0

कोरोना कालावधीत घरपोच मद्य विक्रीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोना निर्बंध हटवण्यात आल्याने घरपोच मद्य विक्रीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. गेले दोन वर्ष देशासह राज्यावर कोरोनाचे संकट होते.

राज्यात कोरोना परिस्थिती गंभीर बनली होती. कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लावण्यात आले होते. या लॉकडाऊनचा परिणाम हा जवळपास सर्वच उद्योगधंद्यांवर झाला. मद्य व्यवसायालाही कोरोनाचा मोठा फटका बसला. मद्य व्यवसायिकांना दिलासा देण्यासाठी जे परवानाधारक मद्य विक्रेते आहेत, त्यांना घरपोहोच दारू विकण्याची परवानगी देण्यात आली होती.

मात्र आता सर्व निर्बंध शिधील झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!