नका रे असं छळू…
नका रे असे वाभाडे काढू !
बोललो नाही, तरीही बोलता…
आणि बोललो, तरीही बोलता !
200 दिवस बोललो नाही, त्यावरून बोलता…
200 दिवसांनी बोललो तरी, त्यावरूनही बोलता !
पुन्हा एकदा आमदार झालो, पण पालकमंत्री नाही;
मंत्रिपद मिळालं खरं पण ते देखील टिकलं नाही !
आता तेवढा बंगला उरलाय, तो देखील सोडू म्हणता…
मुंबईत राहायला घर नाही, राहायचं कुठं तुम्हीच सांगा ?
कुणी घर देता का रे? घर?
या DM ला, कुणी घर देता का रे? घर?
एक आमदार बंगल्या वाचून,
मंत्रिपदा वाचून,
सहकाऱ्यांच्या माये वाचून,
मुख्यमंत्र्यांच्या दये वाचून
मुंबईच्या गल्लीबोळात हिंडत आहे
जिथून कुणी उठवणार नाही
अशी जागा ढूंढत आहे,
कुणी, घर देता का रे? घर?
खरंच सांगतो मतदारांनो
DM आता थकून गेलाय,
कोर्टात-मंदिरात, दवाखान्यात
अर्ध-अधिक तुटून गेलाय,
आरोपांच्या लाटांवरती.
वाद-विवादांच्या जाळावरती,
झेप झुंजा घेऊन घेऊन,
DM आता थकून गेलाय
जळके तुटके पंख पालवित,
खुरडत खुरडत उडतंय,
खरंच सांगतो बाबांनो,
या DM ला त्याचं DM पणच नडतंय
कुणी घर देता का रे? घर?
DM ला बंगला नको,
‘सातपुड्या’चा थाट नको,
मित्र नको, शत्रू नको,
कोर्टा मधली केस नको,
एक हवं लहान घर..
पंख मिटून पडण्यासाठी,
एक हवी मंत्रिपदाची खुर्ची..
या DM ला बसण्यासाठी,
आणि… आणि एक विसरू नका बाबांनो,
एक कोपरा हवाय…
मागल्या खोलीत…
मौन धारण करण्यासाठी
कुणी घर देता का रे? घर?
या DM ला, कुणी घर देता का रे? घर?