गुगलवर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नव्हे तर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री

248 0

महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेला सुरुंग लावून  महाराष्ट्रात मोठ्या सत्ता संघर्षानंतर भाजपच्या पाठींब्याने शिंदे सरकार स्थापन झालं खरं मात्र आता गुगलवर देवेंद्र फडणवीस असं सर्च केल्यावर समोर येणारी माहिती अनेकांना चकीत करत आहे.

 कारण देवेंद्र फडणवीस यांच्या नावाखाली चक्क उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे गुगल गंडलंय, की गुगल गंडवतंय, अशा चर्चांना उधाण आलं असून 30 जून रोजी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे नववे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. तर 2014 ते 2019 या काळात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

दरम्यान, आता गुगलच्या टेक्निकल चुकीमागे ह्युमन एरर आहे की आणखी काही, यावरुन चर्चांना उधाण आलं आहे.

Share This News
error: Content is protected !!