राष्ट्रीय ‘नारी शक्ती पुरस्कार’ विजेत्यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

117 0

राष्ट्रीय स्तरावरील ‘नारी शक्ती पुरस्कार’ विजेत्या महाराष्ट्रातल्या तीन महिलांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. आंतरराष्ट्रीय महिलादिनी आज (8 मार्च) या तिघींसह देशातील 29 महिलांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

या पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या दिव्यांग कथक नर्तिका सायली नंदकिशोर आगवणे, पहिल्या महिला सर्पमित्र वनिता जोगदेव बोराडे आणि सामाजिक उद्योजिका कमल कुंभार यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्यावतीने ‘नारी शक्ती पुरस्कार’ दिले जातात. त्यामध्ये यंदा महिला सक्षमीकरण आणि विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या देशातील 29 महिलांना 2020 आणि 2021 यावर्षांचे ‘नारी शक्ती पुरस्कार’ प्रदान केले जाणार आहेत.

‘राजमाता जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, क्रांतिज्योती सावित्रीबाई यांसह अनेक कर्तबगार स्त्रियांनी हा महाराष्ट्र घडवला आहे. हा वारसा आणि वसा पुढे घेऊन जाणाऱ्या महाराष्ट्रातील माता-भगिनींना असे पुरस्कार पुन्हा-पुन्हा मिळणे, त्यांची कर्तबगारी सिद्ध होणे हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन संदेशात म्हटले आहे.

Share This News

Related Post

भाजपाचं मिशन 45; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौऱ्यामागे काय आहे रणनीती

Posted by - August 8, 2022 0
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान बारामती दौऱ्यावर येत असून यावरून शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता…
Satara News

Satara News : संतापजनक ! मायलेकीला कपडे फाटेपर्यंत मारहाण; साताऱ्यामधील घटना

Posted by - July 24, 2023 0
सातारा : साताऱ्यामध्ये (Satara News) माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये साताऱ्यात (Satara News) फलटणमधील कुरवली खुर्द या…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन

Posted by - July 9, 2022 0
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्र सदनाच्या परिसरात स्थित महापुरुषांच्या पुतळयांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्री…
Latur Accident

Latur Accident : लातूर-नांदेड महामार्गावर कारचा भीषण अपघात; देवदर्शनासाठी निघालेल्या 4 जणांचा मृत्यू

Posted by - March 4, 2024 0
लातूर : राज्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणाचा वाढतच चालले आहे. अशीच एक अपघाताची घटना लातूर-नांदेड महामार्गावर (Latur Accident) घडली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *