HIV बाधितांच्या मुलांच्या वाट्याला वनवासच ! बीडमध्ये एका मुलाला इंग्रजी शाळेनं प्रवेश नाकारला… पाहा VIDEO

271 0

बीड : आई-वडील एचआयव्ही बाधित आहेत , म्हणून त्यांच्या मुलाला एका इंग्रजी शाळेनं प्री-प्रायमरीत प्रवेश नाकारल्याचा संतापजनक प्रकार बीडमधील पाली येथे घडल्याचं समोर आलंय. या घटनेमुळं एचआयव्ही बाधितांच्या पाल्यांच्या वाट्याला पुन्हा तोच वनवास आलाय.

आपला मुलगा इंग्रजी शाळेत शिकावा म्हणून आई-वडील दोघांनीही प्रयत्न केले आणि अखेर पाली येथील परिवर्तन इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला. फी भरली शिवाय या शाळेनं त्याला दीड महिना शिकवलंसुद्धा ! मात्र एकेदिवशी अचानक तुमच्या मुलाला शाळेत पाठवू नका, असा निरोप शाळेकडून आल्याचा आरोप पीडित मुलाच्या आईनं केलाय. त्यामुळं 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असतानाही त्याला शाळेत पाठवता आलं नाही, अशी खंत या पीडित आईनं बोलून दाखवली.

एचआयव्हीबाधित आई-वडलांच्या मुलाला समाजाकडून दिली जाणारी ही वागणूक अत्यंत चुकीची असून या पाच वर्षीय मुलाकडून त्याचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेतला जातोय हे दुर्दैव आहे, असं मत इन्फट इंडिया प्रकल्पाचे संचालक दत्ता बारजगे यांनी व्यक्त केलं.

परिवर्तन प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या संचालक आणि शिक्षकांकडं यासंदर्भात विचारणा केली असता , आम्ही मुलाला कोणतीही हीन वागणूक दिलेली नसून तसे फोटो आणि व्हिडिओ आमच्याकडे आहेत . मात्र तो मुलगा शाळेत येणार असेल तर आमची मुलं पाठवणार नाही, असा आक्रमक पवित्रा पालकांनी घेतलाय. आता शासन आणि प्रशासनानं याबाबत मदत करावी, अशी मागणी शाळेचे संचालक अशोक शिंदे यांनी केलीये.

दरम्यान, या घडलेल्या प्रकारा संदर्भात बीडचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांना विचारले असता प्री-प्रायमरी स्कूल ही खाजगी आहे. तिला कुठलीही मान्यता नाही मात्र सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही त्यांना सूचना केली असून याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी प्रतिक्रिया बीडचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली.

गावातील पालक भीतीपोटी मुलांना शाळेत पाठवत नाहीत. म्हणून संस्थाचालक देखील अडचणीत आहेत तर मुलाला शिक्षण मिळावं म्हणून एचआयव्ही बाधित पालकही आग्रही आहेत. या वादाकडं पाहाता एचआयव्ही संदर्भात आरोग्य विभागाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून केली जात असलेली जनजागृती केवळ कागदोपत्रीच उरली असल्याचं दिसून येतंय. एचआयव्ही लोकांचा गैरसमज दूर करताना अजूनही जनजागृती कमी पडतेय हेच खरं !

Share This News

Related Post

Nashik News : नाशिकमध्ये आसाम रायफल्स माजी सैनिक संघ केंद्राचे 21 एप्रिलला उद्घाटन

Posted by - April 15, 2024 0
नाशिक : आसाम रायफल्स वेटरन्स दिन 23 मार्च 2024 रोजी साजरा (Nashik News) झाला. त्यानंतर आता आसाम रायफल्स महानिदेशालय,आसाम रायफल्स…

Optical Illusion : या फोटोमध्ये ‘फ्रिज’ नक्की कुठे आहे ? हे शोधायला अनेकांना घाम फुटला, तुम्हाला सापडला का ? पहा फोटो

Posted by - October 17, 2022 0
सोशल मीडियावर रोजच काहीतरी चित्रविचित्र पोस्ट होत असतं. आणि व्हायरल देखील होत असतं. सध्या सोशल मीडियावर हा एक फोटो व्हायरल…

मग, मातोश्रीवर हल्ला करायचा होता; तेव्हा कळलं असतं… आ.दिलीप मोहिते यांचं वक्तव्य

Posted by - April 10, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर एस.टी कामगारांनी केलेल्या हल्ल्यांनंतर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान…

महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड : सामाजिक कार्यातून राहूल बोरोलेंनी निर्माण केलं अस्तित्व

Posted by - November 8, 2022 0
आजच्या तरूणांसमोर उद्योग, व्यवसाय करणे म्हणजेच आव्हाने ठरत आहे. परंतु आव्हानांनाही संधी मानून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे काही युवक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *