मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली समृद्धी महामार्गाची पाहणी

261 0

देवेंद्र फडणवीसांचा महत्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या समृध्दी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आहे.मात्र, त्यापूर्वी आज (रविवार 4डिसेंबर) सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर ते शिर्डी असा प्रवास सोबत करून समृद्धी महामार्गाची पाहणी केली.

नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील सालईदाभा या टोल नाक्याजवळ उद्घाटनाचा कार्यक्रम होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी या स्थळी भेट दिली. त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ. समीर मेघे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून रस्त्यांचे झालेले एकूण काम व कार्यक्रमाची तयारी याचा आढावा घेतला. रविवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सकाळी साडेआठ वाजता विमानाने नागपूरला आगमन होईल. त्यानंतर खा. कृपाल तुमाने यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. तेथून सकाळी १०.१५ वाजता ते समृद्धी महामार्गाच्या झिरो पॉइंटवर पोहचले. येथून ते उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत शिर्डीपर्यंत समृद्धी महामार्गाने प्रवास केला आहे

Share This News
error: Content is protected !!