छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसीत सनशाइन एंटरप्रायजेस या कंपनीला भीषण आग लागल्याची (Chhatrapati Sambhajinagar) घटना रविवारी घडली होती. या घटनेत कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली. या अपघातामध्ये सहा कामगारांचा मृत्यू झाला होता. पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यादेखील जळून खाक झाल्या होत्या. दरम्यान आता या कंपनीबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कंपनीबाबत ‘ही’ माहिती आली समोर
ही कंपनी विदेशी भासवण्यासाठी कंपनीच्या वेबसाईटवर बनवेगिरी केल्याचं समोर आलं आहे. ही कंपनी आंतरराष्ट्रीय भासविण्याचा खटाटोप करण्यात आला आहे. या कंपनीच्या वेबसाइटवर विदेशी व्यक्ती संचालक आणि सीईओ असल्याचं भासवण्यात आलं आहे.कंपनीच्या वेबसाइटवर एक्सपर्ट टीम म्हणून आणि कंपनीचे संचालक म्हणून विदेशी व्यक्तींच्या नावासह छायाचित्र दर्शविण्यात आलं आहे. या घटनेमुळे आता कंपनीची वेबसाईटही चर्चेत आली आहे. या वेबसाईटवर कंपनीबाबत आणि कंपनीच्या उत्पादनांबाबत माहिती देण्यात आली आहे.
यासोबतच कंपनीची एक्स्पर्ट टीम म्हणून चार विदेशी व्यक्तींच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांना संचालक, सीईओ अशी पदे देण्यात आली आहे. आता पोलिसांकडून याबाबत तपास केला जात आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Truck Driver Strike : आंदोलनाचा इंधन पुरवठ्याला मोठा फटका
Sur Nava Dhyas Nava : अकोल्याचा गोपाळ गावंडे ठरला ‘सूर नवा ध्यास नवा’चा विजेता
Japan Earthquake : जपान हादरलं ! भूकंपाचे एकापाठोपाठ 21 धक्के; थरकाप उडवणारा व्हिडिओ आला समोर
Navi Mumbai : केंद्र सरकारच्या नव्या कायद्यामुळे आक्रमक होऊन ट्रकचालकांनी पोलिसांना केली मारहाण
Bollywood Movie : : ‘या’ वर्षात बॉक्स ऑफिस गाजवणार ‘हे’ 6 मोठे चित्रपट
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा; म्हणाले …
Supriya Sule : ‘सुप्रियाताई 15 वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या..’ रुपाली चाकणकरांची टीका
Fixed Deposit Interest Rates : ‘या’ 5 बँकांनी ग्राहकांना दिलं न्यू ईयर गिफ्ट