Breaking News
Cabinet Expansion

Cabinet Expansion : अखेर मुहूर्त मिळाला ! ‘या’ दिवशी पार पडणार मंत्रिमंडळाचा विस्तार

667 0

मुंबई : शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) रखडला होता. यावरून विरोधकांनी अनेकवेळा टीकादेखील केली होती. अखेर या मंत्रिमंडळ विस्ताराला (Cabinet Expansion) मुहूर्त मिळाला आहे. हा मंत्रिमंडळाचा विस्तार 9 किंवा 10 जुलै रोजी होणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर हा विस्तार होणार आहे.

Rahul Gandhi : राहुल गांधींना मोठा धक्का! गुजरात हायकोर्टाने ‘ती’ याचिका फेटाळली

Pankaja Munde : भाजप फुटेल असा दिवस येऊ नये : पंकजा मुंडे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची बैठक
गुरुवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नंदनवन या शासकीय निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. आता उर्वरित मंत्रीमंडळात भाजप व शिवसेनेच्याच आमदारांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे आमदार शपथ घेणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!