Buldhana News

Buldhana News : इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे बुलढाण्याच्या बोरी अडगावमध्ये तणावपूर्ण वातावरण

591 0

बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव गावातील युवकाने इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह मजकूर (पोस्ट) टाकल्याने गावात तणाव निर्माण झाला आहे. यामुळे गावकऱ्यांनी टायर जाळून व गावबंद करून घटनेचा निषेध केला आहे. याची माहिती मिळताच त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
एका युवकाने इन्स्टाग्रामवर छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या संदर्भात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला आहे. यामुळे गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी गाव बंदचे आवाहन करून रस्त्यावर टायर जाळण्यात आले आहे. गावामध्ये खामगाव पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला असून सध्या तेथे तणावपूर्ण शांतता आहे. ज्या तरुणाने ही आक्षेपार्ह पोस्ट केली आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Buldhana Accident : बुलढाणा हळहळलं ! आई आणि मुलीची ‘ती’ भेट ठरली अखेरची

Yerwada Jail : कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा जेलमधून फरार; कारागृहाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Navi Mumbai Video : मालकाचा नंबर दिला नाही म्हणून तरुणाने तलवार घेऊन पसरवली दहशत

Mulshi Accident : मुळशीतील पिरंगुट घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पोचा भीषण अपघात

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!