pune election result bjp

पुण्यातील मध्यवर्ती भागात भाजपची पकड मजबूत: प्रभाग 25 मध्ये चारही उमेदवार विजयी

101 0

पुण्याच्या(PUNE) मध्यवर्ती आणि ऐतिहासिक पेठा असलेल्या भागात भाजपने (BJP) आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपच्या चारही उमेदवारांनी विजय मिळवत क्लीन स्वीप केला आहे. त्यामुळे हा विजय भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

या निकालासह पुण्यात (PUNE)(BJP)भाजपचं सहावं पॅनल विजयी ठरलं आहे. प्रभाग २५ मधून राघवेंद्र (बापू )मानकर, (RAGVENDRA MANKAR) स्वरदा बापट (SWARADHA BAPAT), कुणाल टिळक (KUNAL TILAK) आणि स्वप्नाली पंडित (SWAPNALI PANDIT) हे उमेदवार विजयी झाले आहेत. राघवेंद्र मानकर(RAGVENDRA MANKAR) यांनी २८,६१० मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला असून, हा विजय राज्यातील मोठ्या मताधिक्यांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे.

शनिवार पेठ(SHANIVAR PETH), नारायण पेठ (NARAYAN PETH)आणि सदाशिव पेठेचा(SHADASHIV PETH) काही भाग असा प्रभाग क्रमांक २५ ओळखला जातो. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर, शनिवार वाडा (SHANIVWAR VADA), केसरी वाडा (KESARI WADA)आणि विश्रामबाग वाडा( VISHRAMBAG WADA) यांसारख्या ऐतिहासिक स्थळांचा समावेश असलेल्या या भागात भाजपने(BJP)मिळवलेला विजय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

Share This News
error: Content is protected !!