ठाकरे घराण्यात पुन्हा फूट; बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे यांचा शिंदे गटाला पाठिंबा

353 0

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांना घेऊन शिवसेने विरोधातच बंड केलं या बंडा नंतर शिवसेनेच्या अनेक खासदार,आमदार, माजी आमदार पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिला 

मात्र आता बाळासाहेब ठाकरे यांचे नातू उद्धव ठाकरे यांचे पुतणे व बिंदू माधव ठाकरे यांचे सुपुत्र निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिंदे गटाला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. एवढेच नाही तर निहार ठाकरे हे एकनाथ शिंदे याच्या नेतृत्वात आता राजकारणातही प्रवेश करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे घराण्यातील आणखी एका व्यक्तीची एन्ट्री होणार आहे.

 

निहार ठाकरे हे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे जावई आहेत.काही महिन्यांपूर्वीच निहार ठाकरे आणि अंकिता पाटील यांचा विवाह झाला होता. त्यानंतर निहार हे राजकारणात आपलं नशीब आजमावणार आहेत. निहार ठाकरे हे आतापर्यंत राजकारणात कधीच सक्रिय नव्हते. नुकतीच स्मिता ठाकरे यांनी मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यादेखील शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा होती.

Share This News
error: Content is protected !!