Hidayat Patel passes away

राजकीय वादातून हल्ला, काँग्रेस नेते हिदायत पटेल यांचं निधन

560 0

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल(HIDAYAT PATEL) यांच्यावर मंगळवारी दुपारी अकोट(AKOT)तालुक्यातील मोहाळा येथे धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. जुन्या वादातून झालेल्या या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. अकोल्यातील (AKOLA)खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले.

हिदायत पटेल(HIDAYAT PATEL)(वय ६७ ) मंगळवारी नमाज अदा करून मशिदीबाहेर पडत असताना दुपारी सुमारे दीडच्या सुमारास  उमेद पटेल कालू पटेल (वय २५) या युवकाने त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. मान व पोटावर गंभीर जखमा झाल्याने ते जागीच कोसळले.

घटना स्थळावरील उपस्थितांनी तत्काळ त्यांना अकोट येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे हलविण्यात आले. अकोल्यातील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली. या घटनेमुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.

Share This News
error: Content is protected !!