साताऱ्यात (SATARA)आयोजित करण्यात आलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर वादाचे सावट पसरले आहे. संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी (VINOD KULKARNI) यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी काळी शाई फेकल्याची घटना घडली असून, त्यामुळे साहित्यिक तसेच सांस्कृतिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
साहित्य संमेलन हे विचारमंथन आणि वैचारिक देवाणघेवाणीचे व्यासपीठ मानले जाते. मात्र, याच संमेलनादरम्यान कार्याध्यक्षांवर झालेल्या या प्रकारामुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी अचानक कुलकर्णी (KULKARNI) यांच्याजवळ येत त्यांच्या चेहऱ्यावर काळा बुक्का व शाई फेकली आणि घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकारामुळे उपस्थित नागरिक आणि साहित्यप्रेमींमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेनंतर विनोद कुलकर्णी (VINOD KULKARNI) यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. “माझ्यावर हल्ला का करण्यात आला, याचे कारण अद्याप समजलेले नाही. मात्र, अशा प्रकारांमुळे मी माझे साहित्यिक कार्य थांबवणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या हल्ल्यामागील दोषींना तात्काळ शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
सातारा(SATARA) पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, संमेलन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरू आहे. हल्लेखोरांची ओळख आणि या घटनेमागचा नेमका उद्देश काय होता, याचा शोध पोलीस (POLICE) घेत आहेत.