Breaking News
Ashok Pingle

Ashok Pingle : नवी मुंबईतील अशोक पिंगळे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

3640 0

नवी मुंबई : नवी मुंबईतील अशोक पिंगळे (Ashok Pingle) यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे. एकट्याने दुचाकीवर अष्टविनायक परिक्रमा पूर्ण करण्याचा त्यांनी रेकॉर्ड केला आहे. सर्वात कमी कालावधीत यात्रा पूर्ण करणारे दुचाकीस्वार म्हणून त्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. पिंगळे हे मागील अनेक वर्षांपासून दुचाकीवर यात्रा करत आहेत. परंतु डिसेंबर महिन्यात त्यांनी एकट्याने अष्टविनायक परिक्रमा पूर्ण करण्याचा रेकॉर्ड केला.

24 डिसेंबरला त्यांनी मोरगावपासून या यात्रेला सुरुवात केली. त्यानंतर पुढील दिवशी म्हणजेच 25 तारखेला ते अष्टविनायक गणपती असणाऱ्या आठही गणपतींची परिक्रमा करून पुन्हा मोरगावला परतले. यामध्ये त्यांनी सर्व प्रवास दुचाकीवर एकट्याने केला आहे. सदर परिक्रमा त्यांनी 33 तास 28 मिनिटांत पूर्ण केली असून यामध्ये त्यांनी 750 किलोमीटर अंतर पार केले आहे. यामुळे अशोक यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे. इंडिया रेकॉर्ड ऑफ बुककडून अशोक यांना मेडल, प्रमाणपत्र आणि बुक देऊन गौरवण्यात आले.

Share This News
error: Content is protected !!