काँग्रेस नेते अशोक चव्हाण कोरोना पॉझिटिव्ह, मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना आला मेसेज

337 0

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना करोनाची लागण झाल्यानंतर आता काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना अशोक चव्हाण यांच्या फोनवर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा मेसेज आला. त्यानंतर त्वरित अशोक चव्हाण बैठकीतून निघून गेले.

दर आठवड्याला बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडते. पण यावेळी प्रजासत्ताक दिन असल्याने अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा आणि निर्णय घ्यायचे असल्याने मंत्र्यांनी केलेल्या आग्रहानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत अशोक चव्हाणांच्या फोनवर त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचा एक मेसेज आला.

त्यानंतर अशोक चव्हाण यांनी बैठक सोडून निघून गेले. त्यानंतर त्यांनी ट्विट करून त्यांच्या संपर्कातील लोकांना काळजी घेण्यासाठी सांगितले आहे. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी प्रभारींच्या नेतृत्वात पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीतही उपस्थिती नोंदवली होती.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!