मुंबई: महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत विराट महामोर्चाच आयोजन करण्यात आलं असून या महामोर्चाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रमुख नेते सहभागी झाले आहेत.
मात्र आता काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण मात्र या मोर्चा पासून लांब असून ते या मोर्चात सहभागी होणार नाही स्वतः अशोक चव्हाण यांनी याबाबत ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली असून त्या आपल्या ट्विटमध्ये लिहितात महाविकास आघाडीच्या १७ डिसेंबर रोजी नियोजित मोर्चाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र एका निकटवर्तीय कुटुंबातील नांदेड येेथे पूर्वनियोजित विवाह सोहळ्यामुळे मला मोर्चात सहभागी होणे शक्य नाही. अशोक चव्हाण जरी या मोर्चात सहभागी होणार नसले तरी त्यांच्या पत्नी आणि माजी आमदार अमिता चव्हाण तिथे मात्र मोर्चात उपस्थित राहणार आहेत
कृपया वस्तुस्थितीची नोंद घ्यावी असं आवाहन देखील अशोक चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना केलं आहे.
महाविकास आघाडीच्या १७ डिसेंबर रोजी नियोजित मोर्चाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र एका निकटवर्तीय कुटुंबातील नांदेड येेथे पूर्वनियोजित विवाह सोहळ्यामुळे मला मोर्चात सहभागी होणे शक्य नाही. माजी आमदार सौ. अमिता चव्हाण तिथे उपस्थित राहतील.
कृपया वस्तुस्थितीची नोंद घ्यावी.— Ashok Chavan (@AshokChavan1958) December 16, 2022