आपला महाराष्ट्र

ANJALI DAMANIA: पंकजा आणि धनंजय मुंडेंनी द्यावा मंत्रीपदाचा राजीनामा

ANJALI DAMANIA : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याने पुण्यातील सीआयडी कार्यालयात मंगळवारी 31/12/24 ला सरेंडर केले. वाल्मिक कराडच्या सरेंडरनंतर सोशल अॅक्टिव्हिस्ट अंजलि दामनिया (ANJALI DAMANIA )यांनी पत्रकारांशी बोलताना काही महत्त्वाच्या बाबी मांडल्या.

BREAKING NEWS! अखेर वाल्मिक कराड पोलिसांना शरण

अंजलि दामनियांनी सांगितले की, “या प्रकरणाची योग्य चौकशी होईपर्यंत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.” दामनियांच्या मते, जर मुंडे बहीण-भावाच्या हातात सत्ता राहिली, तर चौकशी प्रभावित होऊ शकते.

तसेच, दामनिया म्हणाल्या की, वाल्मिक कराड हे पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या जवळचे होते आणि त्या भागात वसूलीचे काम करत होते. संतोष देशमुख यांची हत्या वसूलीमुळेच झाली होती, असे त्यांनी सांगितले.

TOP NEWS MARATHI LIVE