Amrut Senior Citizen Scheme: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अभिनव आणि उपयुक्त योजना सुरू केली आहे. या (Amrut Senior Citizen Scheme) योजनेचे नाव “अमृत ज्येष्ठ नागरिक योजना” असून, यामार्फत ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना अवघ्या ₹५८५ मध्ये संपूर्ण वर्षभरासाठी महाराष्ट्र राज्यात अमर्याद आणि मोफत एस.टी. प्रवासाची सुविधा मिळणार आहे. ही योजना वयोवृद्ध प्रवाशांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या सन्मानासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे.
CHHATRPATI SAMBHAJINAGAR CRIME: चिमुकल्यांसमोरच वडलांची बोटं छाटली, वार केले अन्…
या योजनेचा लाभ फक्त ७५ वर्षे पूर्ण केलेल्या किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनाच मिळणार आहे. लाभ घेणाऱ्या व्यक्तीने फक्त (Amrut Senior Citizen Scheme) एकदाच ₹५८५ भरून एक स्मार्ट कार्ड बनवून घ्यायचे आहे. हे स्मार्ट कार्ड मिळाल्यानंतर त्या व्यक्तीला संपूर्ण वर्षभर राज्यातील विविध एस.टी. बस सेवेचा अमर्याद वापर करता येतो. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना महाराष्ट्रातील साधी एस.टी. बस, शिवशाही, शिवशाही स्लीपर आणि शयन बस तसेच ज्या मार्गांवर लागू आहे तिथे शिवनेरी बस सेवेचा मोफत लाभ घेता येतो.
ELECTRIC BOND MAHARASHTA : महाराष्ट्रात कागदी बॉंड्सची झंझट संपुष्टात! ई-बॉंड प्रणालीचे युग सुरू
स्मार्ट कार्ड तयार करताना अर्जदाराने वय आणि ओळख सिद्ध करणारी वैध कागदपत्रे सादर करावी लागतात. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर कोणतेही वैध सरकारी फोटो ओळखपत्र जसे की मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, सीनियर सिटिझन कार्ड यांचा समावेश होतो. ही कागदपत्रे अर्ज करताना जमा करणे आवश्यक आहे.
SANJAY RAUT ON RAMDAS KADAM: रामदास कदमांच्या आरोपांवर संजय राऊत आक्रमक
स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत – जवळच्या एस.टी. आगारात प्रत्यक्ष जाऊन अर्ज करता येतो किंवा महामंडळाच्या (Amrut Senior Citizen Scheme) अधिकृत ऑनलाईन पोर्टलवरूनही अर्ज करता येतो. दोन्ही पर्यायांतून अर्ज करून आपले कार्ड तयार करता येते. एकदा कार्ड मिळाल्यानंतर, ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्रभर कधीही, कुठेही एस.टी. बसने मोफत प्रवास करू शकतात. वृद्धत्वामध्ये अनेकांना दररोजच्या प्रवासासाठी आर्थिक अडचणी येतात. अशा वेळी ही योजना त्यांच्या आर्थिक भारात मोठा दिलासा देणारी ठरते. महाराष्ट्र सरकारने यापूर्वी महिलांसाठी अर्ध तिकीट सवलतीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ७५ वर्षांवरील महिलांना आता दुहेरी लाभ मिळू शकतो – एकीकडे अर्ध तिकीट योजना आणि दुसरीकडे “अमृत ज्येष्ठ नागरिक योजना”.
Propertyscam: लाखांत फ्लॅट? दहा लाखांत घर?,आकर्षक ऑफर्समागे मोठा सापळा!
जर आपल्या कुटुंबात ७५ वर्षांवरील वयोवृद्ध सदस्य असतील, तर त्यांच्यासाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे तत्काळ अर्ज करून त्यांना या योजनेचा लाभ घेण्यास प्रवृत्त करणे हे कुटुंबीयांचेही एक सामाजिक कर्तव्य आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या एस.टी. आगारात संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.