Devendra Fadnavis on Udhav Raj Thackeray interview

मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीत ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत, फडणवीसांचा अप्रत्यक्ष टोला…

300 0

मुंबई (MUMBAI) महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात हालचाली वाढल्या आहेत. याच दरम्यान ठाकरे बंधू राज ठाकरे(RAJ THACKERAY)आणि उद्धव ठाकरे(UDHAV THACKERAY) यांची पहिली संयुक्त मुलाखत आज सकाळी आठ वाजता प्रसारित झाली आहे. ही मुलाखत संजय राऊत(SANJAY RAUT) आणि महेश मांजरेकर(MAHESH MANJAREKAR) यांनी घेतली आहे.

मुलाखतीपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(DEVENDRA FADNAVIS) यांनी ठाकरे बंधूंवर नाव न घेता टीका केली. “महाराष्ट्रात एकच ब्रँड होता, ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.(BALASAHEB THACKERY)त्यानंतर कोणीही ब्रँड नाही,” असे ते म्हणाले. तसेच, स्वतःला ब्रँड समजणाऱ्यांना योग्य जागा दाखवू, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, भाजप नेते महेश लांडगे (MAHESH LANDAGE)यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार(AJIT PAWAR) यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. अजित पवार हे महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे प्रमुख चेहरे आहेत, असा दावा करत त्यांनी, भ्रष्टाचार झाकण्यासाठी ते भाजपसोबत आले का, असा सवाल उपस्थित केला. यावर अजित पवार यांनी, 15 तारखेनंतर जनता निर्णय देईल,असे प्रत्युत्तर दिले.

आगामी काळात शिवतीर्थावर ठाकरे गट, मनसे (MNS)आणि राष्ट्रवादीची मोठी सभा होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच उल्हासनगरमध्ये गुंडाराज सहन केला जाणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Share This News
error: Content is protected !!