मंत्रिमंडळाबरोबरच पावसाळी अधिवेशनाचा देखील मुहूर्त ठरला? या तारखेपासून होणार पावसाळी अधिवेशन

211 0

मुंबई: राज्यात रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याती शक्यता आहे. उद्या सकाळी ११ वाजता मंत्र्यांच्या शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर हा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

त्यानंतर तीन वाजता विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. बुधवारपासून विधीमंडळ अधिवेशनाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. उद्या मोहरमची शासकीय सुट्टी रद्द करून विधिमंडळाचं कामकाज सुरू राहणार असल्याची देखील माहिती मिळाली आहे. 10 ऑगस्ट ते 19 ऑगस्टदरम्यान विधिमंडळाचं अधिवेशन होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.

Share This News
error: Content is protected !!