महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीचा प्रचार आता थंडावला असून गुरुवारी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर बोगस आणि दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.
ठाकरे बंधूंनी या विषयावर कठोर भूमिका घेतली आहे. राज ठाकरे(RAJ THACKERAY) आणि अमित ठाकरे(AMIT THACKERAY) यांनी दुबार मतदार आढळल्यास मतदान केंद्रावरच जाब विचारण्याचा इशारा दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही दुबार मतदारांना रोखण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून सक्रिय राहणारे विशेष पथक तैनात केल्याची माहिती दिली.
या भूमिकेला भाजप (BJP) मंत्री नितेश राणे(NITESH RANE) यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ठाकरे गटावर राजकीय नौटंकीचा आरोप करत मतदार यादी सुधारणा कार्यक्रमालाच विरोध केला जात असल्याचा दावा केला. तसेच, खरंच ठोस कारवाई करायची असेल, तर भेरमपाडा आणि नल बाजारसारख्या भागांत जा, जिथे बोगस मतदारांची संख्या अधिक आहे,” असे आव्हानही राणे यांनी दिले.
दरम्यान, निवडणूक आयोगाने दुबार मतदारांच्या मुद्द्यावर आधीच निर्णय घेतला असून, अशा मतदारांच्या नावासमोर ‘डबल स्टार’ चिन्ह देण्यात आले आहे. संबंधित मतदारांनी प्रतिज्ञापत्राद्वारे एकाच ठिकाणी मतदान करावे, अशी व्यवस्था आयोगाने केली आहे.