जळगाव : अमळनेर येथे होणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आले असून संमेलनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी येण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे देखील समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी आज दिली.
97 वे मराठी साहित्य संमेलन 2, 3 व 4 फेब्रुवारी 2024 रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. गिरीश महाजन यांनी आज अमळनेर येथे जावून साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संमेलनाच्या विविध ठिकाणी जावून प्रत्यक्ष पाहणी केली. आतापर्यंत झाले नाही असे संमेलन करून दाखायचं आहे, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रताप महाविद्यालय,अमळनेर येथे झालेल्या बैठकीत बोलतांना ना.महाजन म्हणाले की, संमेलनाचा मी स्वागताध्यक्ष आहे. या संमेलनात कुठलीही कमी राहता कामा नाही, याची आपण दक्षता घेवू. आतापर्यंत झाले नाही असे संमेलन करून दाखायचं आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सर्वजण आपल्या सोबत आहेत, कोणीही काळजी करु नये. तुम्ही सर्वजण कामाला लागा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना दिले. संमेलनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आले असून मुख्यमंत्री व दोन्ही, उपमुख्यमंत्र्यांनी येण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगितले यावेळी त्यांनी बैठकीतून थेट ना.गडकरी यांना फोन लावून चर्चा केली. चर्चेनंतर गडकरी यांनी येण्याचे आश्वासन दिले असल्याने त्यांनी सांगितले.
या बैठकीला माजी आमदार शिरीष चौधरी, मराठी वाङ्मय मंडळ अमळनेरचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारी सदस्य प्रा. डॉ. पी बी भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा. श्याम पवार, प्रा. शीला पाटील, अजय केले, बजरंग अग्रवाल यांच्यासह खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्यउपाध्यक्ष प्रदिप अग्रवाल, सदस्य हरी वाणी, डॉ. संदेश गुजराथी, कल्याण पाटील, विनोद पाटील, निरज अग्रवाल, योगेश मुंदडे, चिटणिस प्रा. डॉ.ए.बी. जैन, सहचिटणिस प्रा. डॉ. डी. आर. वैष्णव, प्रा. आर. एम. पारधी, विनोद मधुकर पाटील तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व श्री.गायकवाड उपस्थित होते.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Tanaji Sawant Car Accident : कोल्हापुरात आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या ताफ्याचा अपघात
Sunil Kedar : सुनील केदार यांची आमदारकी रद्द; काँग्रेसला मोठा धक्का
Terrorist Attack : दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला ! नमाज अदा करत असताना निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या
WFI : केंद्र सरकारकडून भारतीय कुस्ती संघाचे निलंबन
Ajay Devgan : ‘सिंघम 3’ च्या सेटवर अजय देवगणचा अपघात; दुखापतीमुळं चित्रपटाचं शूटिंग कॅन्सल
Accident News : भीषण अपघात ! रिक्षाला पाठीमागून भरधाव कारने धडक दिल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव ! ‘या’ ठिकाणी आढळला कोरोनाचा रुग्ण
Jammu – Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये मोठी चकमक; 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांना धाडलं कंठस्थानी