AJIT PAWAR NCP

पुणे पिंपरी महापालिका निकालानंतर अजित पवारांचा कार्यकर्त्यांना स्पष्ट सल्ला

73 0

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये (PMC & PCMC ELECTION) उपमुख्यमंत्री अजित पवार (AJIT PAWAR) यांनी जोरदार प्रचार करूनही त्यांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर अजित पवार(AJIT PAWAR) यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना थेट आणि स्पष्ट शब्दांत सल्ला दिला आहे.

महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होताच आता जिल्हा परिषद(ZILLA PARISHAD) आणि पंचायत समिती (PANCHAYAT SAMITI) निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. त्यानिमित्ताने अजित पवार (AJIT PAWAR) पुणे (PUNE) जिल्ह्यात सभा घेत असून खेड (KHED) तालुक्यातील एका सभेत बोलताना त्यांनी राजकारणावर परखड मत व्यक्त केले. राजकारण खूप वंगाळ आहे. त्यामुळे धंदा पाणी करा, नीट राहा, मुलांना चांगले शिक्षण द्या आणि निर्व्यसनी रहा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

एमआयडीसीसाठी(MIDC) ज्यांची जमीन गेली आहे, त्यांना मोबदला मिळालेला आहे. तो पैसा निवडणुकीत खर्च करू नका. काही लोकांना अचानक पैसे मिळाले की बायकोला निवडणुकीत उभं करायचं सुचतं. पण पैसे संपल्यानंतर काय करणार ? असा सवाल करत अजित पवारांनी (AJIT PAWAR)अप्रत्यक्षपणे निवडणूक खर्चावरही भाष्य केले.

विधानसभा निवडणुकीतील खेड(KHED)तालुक्याच्या निकालाचा उल्लेख करत ते म्हणाले, तेव्हा जनतेने वेगळा निर्णय घेतला. मी माझी भूमिका स्पष्ट केली होती. लोकशाही आहे, त्यामुळे मी त्यात खोलात जात नाही. मात्र शेवटी विकास करणारी माणसं कोण आहेत, हे लोकांच्या लक्षात येतं. यावेळी त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार बाबा काळे यांच्यावर अप्रत्यक्ष टीकाही केली.

दरम्यान, महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार(SHARAD PAWAR)  हे दोन्ही गट एकत्र लढले होते. आता जिल्हा परिषद(JILLA PARISHAD) आणि पंचायत समिती निवडणुकांसाठीही दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या शनिवारी बारामती (BARAMATI) येथे ज्येष्ठ नेते शरद पवार (SHARAD PAWAR)  यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केल्याची माहिती आहे.

Share This News
error: Content is protected !!