सर्वोच्च न्यायालयात सुनावणीपूर्वी शिवसेना आणि शिंदे गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर

351 0

नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातल्या राजकारणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आज राज्यात नव्यानं स्थापन केलेल्या सरकारसाठी म्हणजेच शिंदे गटासाठी महत्त्वाचा दिवस आहे.

या सुनावणीपुर्वी शिवसेनेकडून कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. माविआच्या प्रयोगावर मतदार नाराज असल्याचा शिंदेंचा दावा खोटा आहे असं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. तसेच, गेल्या अडीच वर्षात एकनाथ शिंदेंनी आक्षेप का घेतला नाही? असा सवालदेखील उपस्थित करण्यात आला आहे.

शिवसेनेनंतर शिंदे गटाकडूनही प्रतिज्ञापत्र दाखल

सुनावणीपूर्वी शिवसेनेनंतर शिंदे गटाकडूनही प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं आहे. १६ आमदारांवरील कारवाई अयोग्य असं त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमुद केलं आहे.

Share This News
error: Content is protected !!