शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्या गाडीला अपघात

276 0

मुंबई:  महाड पोलादपूरचे आमदार आणि शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्या गाडीला अपघात झाला आहे  मुंबईमधील ईस्टर्न फ्री-वेवर सात गाड्यांची धडक झाली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

या बाबत स्वतः भरत गोगावले यांनी माहिती दिली असून आज झालेला अपघात हा गाडीतील तांत्रिक बिघाडामुळे झाला असून आपण सुखरुप आहोत. असं देखील गोगावले यांनी सांगितलं.

Share This News
error: Content is protected !!