नागपूरमधील(NAGPUR) विधानपरिषदेचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र ( DEVENDRA FADNAVIS) फडणवीस यांचे निकटवर्तीय भाजप(BJP) नेते संदीप जोशी(SANDEEP JOSHI) यांनी राजकारणातून माघार घेण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली असून, अनेक समर्थक आणि कार्यकर्त्यांनी हा निर्णय पुनर्विचाराने मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.
संदीप जोशी(SANDEEP JOSHI) यांनी पत्राद्वारे आपली भूमिका मांडली आहे. सध्याच्या राजकीय वातावरणावर त्यांनी नाराजी व्यक्त करत, राजकारण हे नेहमीच पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा समाजसेवेचे माध्यम राहिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र सत्तेसाठी होणारे पक्षांतर, संधीसाधूपणा आणि वाढलेली स्पर्धा यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते व सामान्य मतदार अस्वस्थ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मर्यादित संधी आणि वाढलेल्या अपेक्षा ही आजची वास्तवस्थिती असल्याचे सांगत, या परिस्थितीत स्वतःहून थांबण्याचा निर्णय घेतल्याचे जोशी यांनी म्हटले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागत, आपण राजकारणातून कायमचा निरोप घेत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.