KUNDMALA BRIDGE:कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळून मोठी दुर्घटना झाली.
अनेकांचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी कोसळलेल्या पुलावरून नदीपात्रात पडले.
RAJ THACKERAY ON KUNDMALA BRIDGE:राज ठाकरे यांनी राज्य सरकार व प्रशासनाला धारेवर धरत विचारले 8 सवाल
आजूबाजुला असलेल्या सर्व पर्यटकांची बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी धडपड सुरू होती.
मात्र या सगळ्यात आपल्या मालकाला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने मदत मागणारा आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून
मालकाला वाचवणाऱ्या छोटूला पाहून सगळ्यांनाच माणुसकीचं दर्शन झालं.
KUNDMALA RESCUE OPERATION: 51पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश
कुंडमळा गावातील रहिवासी अशोक भेगडे हे एका लग्नसमारंभावरून घरी परतत होते.
त्यांच्यासोबत त्यांचा विश्वासू कामगार छोटू 20 होता. भेगडे हा पूल पार करून जात असतानाच पुलावर गर्दीचा कहर झाला होता.
शंभर दीडशे पर्यटकांनी पूल आणि पुलाच्या अवतीभवती गर्दी केली होती.
कुणी ओसंडून वाहणारं इंद्रायणीचं पाणी पाहत होतं, तर कोणी सेल्फी काढत होतं
EKNATH SHINDE ON KUNDMELA BRIDGE: कुंडमळा दुर्घटनेनंतर सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करणार
त्याचवेळी जीर्ण झालेल्या पुलावरून दुचाकी देखील जात होत्या. दरम्यान पुलावर दोन दुचाकी समोरासमोर आल्यामुळे काही वेळ पुलावर जास्त गर्दी आणि ओव्हरवेट झालं. आणि क्षणातच हा पूल कोसळला.
छोटूचं मुलाकडे लक्ष दिलं तेव्हा तो काही सेकंदात कोसळला, त्याबरोबर भेगडे ही कोसळले.
छोटूला धक्का बसला, क्षणभर काहीच सुचलं नाही. मात्र घाबरलेल्या अवस्थेत मालकाला वाचवण्यासाठी गर्दीतून वाट काढत तो पाण्याच्या दिशेने गेला.
घाबरलेले लोक पुढे घ्यायला तयार नव्हते, मात्र छोटूनं आरडाओरडा सुरू केला. मदतीच्या विनवण्या करू लागला. त्याला पाहून अनेकांमध्ये धीर आला. बरेच जण पुढे सरसावले.
पाण्यात कोसळलेल्यांची मदत करू लागले. काहींनी एकत्र येऊन भेगडे यांना शोधायला सुरुवात केली.
तेवढ्यात पाण्यातून वर येण्यासाठी धडपड करणारे भेगडे दिसले. काही वेळातच भेगडे यांना बाहेर काढण्यात यश आलं.
त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली मात्र जीव वाचला. या सगळ्या गडबडीत छोटू च्या हातालाही दुखापत झाली.
मात्र मालकांचा जीव वाचला आहे महत्त्वाचं.. ते मला त्यांच्या कुटुंबाप्रमाणे सांभाळतात.
त्यांना माझ्या डोळ्यां समोर काही झालं असतं तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकलो नसतो, असं म्हणत छोटू आणि अशोक भेगडे दोघेही उपचारासाठी दवाखान्यात रवाना झाले.
मात्र अशोक भेगडे यांना वाचवण्यासाठी छोटूची धडपड पाहून अनेकांना माणुसकीचं दर्शन घडलं.