फोटोशूट बेतलं जीवावर, 3 तरुणांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

164 0

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात फोटो शूट करण्यासाठी साठवण तलावाजवळ गेलेल्या तीन तरुणांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दौंड कुरकुंभ मार्गावरील मोरेवस्ती जवळ रविवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. दौंड नगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या शहराजवळील मेरगळवाडी येथील तलावात पोहण्यासाठी गेले असता या युवकांचा पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली.

असरार अब्दुल अलीम काझी, करिम अब्दुल हादी काझी, अतिक उझजमा फरिद शेख अशी या युवकांची नावे आहेत. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बराच वेळ घरी न परतल्याने घराच्यांनी व मित्रांनी त्यांचा शोध घेतला दौंड शहरात मेगळवाडी, लिंगाळी येथील पिण्याचे पाणी पुरवठा करणारे दौंड नगरपालिकेच्या तळ्याजवळ जाऊन पाहिले असता तेथे त्यांची गाडी मिळून आली. तलावाच्या नजीक जाऊन शोध घेतला असता तलावाच्या काठाजवळ मुलांचे कपडे व बॅग असे साहित्य मिळून आले. लोकांना संशय आला की, तिघे मुले तलावात पोहत असताना पाण्यात बुडले असावे असा संशय आल्याने दौंड पोलिस स्टेशनला याबाबत माहिती दिली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलीसांनी लोकांच्या मदतीने तलावातील पाण्यात जावून शोध घेतला असता या तिघांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांना दौंड उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले, त्याआधीच तिघांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Share This News

Related Post

Pune Accident

Pune Accident : कुटुंबाचा आधार हरपला ! भीषण अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 8, 2023 0
पुणे : पुणे जिल्ह्यातील (Pune Accident) अंबेगाव तालुक्यातून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. बेल्हे-जेजुरी महामार्गावर असलेल्या लाखनगावामध्ये हा भीषण…
Rishikesh Bedre

Rishikesh Bedre : मराठा आंदोलक ऋषिकेश बेदरेला जामीन मंजूर; मात्र ‘या’ जिल्ह्यात जाण्यास घातली 3 महिन्यांची बंदी

Posted by - December 14, 2023 0
जालना : आंतरवाली सराटी येथील उपोषणास्थळी झालेल्या दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरेला (Rishikesh Bedre) मुंबई उच्च न्यायलयाच्या औरंगबाद खंडपीठाकडून…
Pune News

लष्कर आणि ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्या मदतीने मास्टर बुरहानवर यशस्वी शस्त्रक्रिया

Posted by - March 23, 2024 0
पुणे : बारामुल्ला येथील मास्टर बुरहान हा नऊ वर्षाचा चिमुकला विद्यार्थी हृद्यविकाराच्या यशस्वी शस्त्रकियेनंतर डॅगर परिवार शाळेत परतला आहे. जीवघेण्या…

कांडका पडला! राजाराम सहकारी साखर कारखान्यात महाडिक गटाची दमदार एन्ट्री

Posted by - April 25, 2023 0
कोल्हापूर: छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक विजयी झाले आहेत. त्यांनी विरोधी सतेज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *