बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार ऑनलाईन, कसं कराल डाऊनलोड?

165 0

पुणे- बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा 15 मार्च पासून तर बारावीची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होत आहे. दरम्यान बारावी परीक्षेसाठी बोर्डाचे हॉल तिकीट उद्या (बुधवारी) दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. हॉल तिकीट बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध केले जाणार आहे.

बारावी बोर्डाचे ऑनलाइन हॉल तिकीट www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे. दरम्यान हॉलतिकीट मिळवताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाइन हॉल तिकीट सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील उच्च माध्यमिक शाळा त्यासोबत कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क न घेता सदर हॉल तिकीटची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. हॉल तिकीटावर फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्ती बाबत उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांनी त्यांच्या स्तरावर फक्त त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे. हॉल टिकीट विद्यार्थ्यांकडून हरवल्यास संबंधित शाळा महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने ‘द्वितीय प्रत'( डुप्लिकेट)असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना हॉल तिकीट द्यायचे आहे.

हॉल तिकीट कसे कराल डाउनलोड ?

– इंटरनेट ब्राऊजरमधून www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर जा.

– College login या पर्यायामध्ये जाऊन त्याठिकाणी हॉल तिकीट ऑनलाइन डाउनलोड करा

Share This News

Related Post

धक्कादायक : विवाहित प्रेयसी सोबत तिच्याच सासरी जाऊन करायचा असले उपद्व्याप; अडवणूक करणाऱ्या सासूवरच केला प्रेयसी समोर अत्याचार

Posted by - March 6, 2023 0
नागपूर : आजकाल रक्ताची नाती सुद्धा नातं सांभाळण्यामध्ये रस घेत नाही. अशातच नागपूरमधून एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.…
Prerna Tuljapurkar

Prerna Tuljapurkar : प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर यांची भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

Posted by - December 3, 2023 0
पुणे : पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी सौ. प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर (Prerna Tuljapurkar) यांची नियुक्ती…

पुण्यात अतिरिक्त महसूल आयुक्त अनिल रामोड यांना अटक; घरात सापडली तब्बल ‘इतक्या’ कोटींची रक्कम

Posted by - June 9, 2023 0
पुणे : पुण्यातील महसूल विभागाच्या एका अतिउच्चपदस्थ अधिकाऱ्यावर सीबीआयचा छापा पडला आहे. सीबीआयचे डीआयजी सुधीर हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली ही मोठी…

जुन्या पेन्शन योजनेबाबत शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य म्हणाले…….

Posted by - March 19, 2022 0
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची  शिक्षण परिषद  व वार्षिक अधिवेशन  पनवेल मधील कर्नाळा स्पोर्ट्स क्लबमध्ये पार पडले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *