महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून सातत्याने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होता यासोबतच ईव्हीएम संदर्भातही काही सवाल उपस्थित करण्यात येत होते.
दरम्यान अचानक मतदानाचा टक्का कसा वाढला असा सवालही काँग्रेस कडून उपस्थित करण्यात आल्यानंतर आता काँग्रेस पक्षाला थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडूनच चर्चेसाठी बोलावण्यात आला आहे.
3 डिसेंबर रोजी चर्चेसाठी यावं असं निमंत्रण केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला दिलं आहे. दरम्यान आता केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या हे निमंत्रण काँग्रेस स्वीकारणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे