Skip to content
Top News Marathi

Top News Marathi

Fast, credible Marathi news coverage

  • ठळक बातम्या
  • सुपरफास्ट
  • राजकारण
  • बातम्या पालिकेच्या
  • आपला महाराष्ट्र
  • क्राईम
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • तुमच्यासाठी खास
  • व्हिडिओ
  • अन्य
    • अर्थकारण
    • कृषी
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • खेळ
    • लाईफ स्टाईल
    • व्यक्तिविशेष
    • भटकंती
    • ज्योतिष
    • मनोरंजन
  • Contact Us
Top News Marathi

Top News Marathi

Fast, credible Marathi news coverage

  • ठळक बातम्या
  • सुपरफास्ट
  • राजकारण
  • बातम्या पालिकेच्या
  • आपला महाराष्ट्र
  • क्राईम
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • तुमच्यासाठी खास
  • व्हिडिओ
  • अन्य
    • अर्थकारण
    • कृषी
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • खेळ
    • लाईफ स्टाईल
    • व्यक्तिविशेष
    • भटकंती
    • ज्योतिष
    • मनोरंजन
  • Contact Us
Money
अर्थकारणतुमच्यासाठी खास

Zero Balance Account : खात्यात पैसे नाहीत? नो टेन्शन आता झिरो बॅलन्स असतानाही बँक देणार पैसे

November 25, 2023 newsmar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन धन योजनेने दुर्गम ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना बँकिंग सेवांशी जोडण्यात मदत केली होती. झिरो बॅलन्सवर (Zero Balance Account) चालणाऱ्या या खात्यामुळे कोट्यवधी लोकांना बचत खाते, विमा आणि पेन्शन यासारखे फायदे मिळण्यास मोठी मदत झाली. जन धन खात्याच्या सर्व वैशिष्ट्यांबद्दल फार लोकांना माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला या खात्याच्या अशा एका सुविधेबद्दल सांगणार आहोत ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या सुविधेमध्ये तुम्ही झिरो बॅलन्स असतानादेखील बँक तुम्हाला गरज पडल्यास कधीही 10,000 रुपये देऊ शकते. चला तर मग याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊया…

झिरो बॅलन्स अकाउंट ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेऊ शकता
जन धन खात्यामध्ये खातेधारकांना 10,000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते. खातेधारक झिरो बॅलन्स असतानादेखील कधीही ओव्हरड्राफ्ट (OD) किंवा रु 10,000 पर्यंत क्रेडिट घेऊ शकतात. यापूर्वी ओव्हरड्राफ्ट मर्यादा 5,000 रुपये होती. आता ती 10,000 रुपये करण्यात आली आहे. गरज भासल्यास तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता.

ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय?
ओव्हरड्राफ्ट हा कर्जाचा एक प्रकार आहे. या अंतर्गत, बँक ग्राहकांना विशिष्ट रक्कम कर्ज घेण्याची परवानगी देते.या कर्जावर बँक व्याजही आकारते. तुम्हाला ओव्हरड्राफ्टवर फी देखील भरावी लागेल.

या लोकांना मिळू शकतो लाभ
जर तुम्ही मूलभूत बचत खाते किमान सहा महिने चांगले चालवले असेल, तर तुम्हाला 10,000 रुपयांची सुविधा सहज मिळू शकते. याशिवाय, कुटुंबातील कमावत्या सदस्यांना किंवा महिलांसाठी ओव्हरड्राफ्ट उपलब्ध आहे. यासाठी डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यात सतत पैसे येत राहणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच तुमचे खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असावे. तसेच, तुमचे जन धन खाते इतर कोठेही नसावे. याबरोबर लाभ घेणाऱ्या अर्जदाराचे वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Hingoli News : हिंगोली हळहळलं ! नवरा-बायकोचा वाद चिमुकल्यांच्या जीवावर बेतला

Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीमधील मजूरांच्या सुटकेसाठी ‘या’ प्रकारे बनवला जात आहे बोगदा; Video व्हायरल

Shrirampur News : एजंटकडून सही दिली नाही म्हणून RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

Mumbai Airport : खळबळजनक ! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

Corona Scam : पुणे महापालिकेत कोविड घोटाळ्याप्रकरणी तात्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतीसह तिघांवर गुन्हा दाखल

  • IPS Tushar Doshi : जालना एसपी तुषार दोषींची पुन्हा बदली; ‘या’ ठिकाणी केली पोस्टिंग
  • Gopichand Padalkar : ‘बाबासाहेबांचं नाव नको, पण आरक्षण पाहिजे’, पडळकरांची जरांगेवर नाव न घेता टीका
Copyright © 2026 Top News Marathi. Powered by ColorMag and WordPress.