stock market

Share Market Updates : लोकसभेच्या निकालादरम्यान शेअर मार्केट मध्ये मोठी घसरण

423 6

मुंबई : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. दुपारपर्यंत देशातील बहुसंख्य जागांवरील कल स्पष्ट होणार आहेत. त्यचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. सोमवारी गुंतवणूकदारांनी भरभरूप पैस कमवले मात्र आज शेअर बाजार चांगलाच गडगडला आहे.

एनएसई, बीएसईची सध्याची स्थिती काय?
निवडणुकीच्या निकालामुळे सध्या शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाल्याचे दिसत आहे. त्याचाच परिणाम म्हणून मुंबई शेअराचा निर्देशांक सेन्सेक्स सध्या तब्बल 2206.86 अंकांनी गडगडला असून कालच्या तुलनेत ही 2.89 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. दुसरीकडे निफ्टी 50 मध्येही 2.97 टक्क्यांची घसरण झाली असून सध्या निफ्टी 50 निर्देशांक 22572.80 अकांवर आहे.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!