HINDU ECONOMIC FORUM: Conference on Economy and Entrepreneurship Held in Pune by Hindu Economic Forum

HINDU ECONOMIC FORUM: पुण्यात हिंदू इकॉनॉमिक फोरमतर्फे अर्थकारण आणि उद्योजकता या विषयावर परिषद संपन्न

79 0

HINDU ECONOMIC FORUM: हिंदू इकॉनॉमिक फोरमतर्फे आयोजित “अर्थकारण आणि उद्योजकता परिषद 2025” चा भव्य उद्घाटन सोहळा पुण्यात मंगळवारी सायंकाळी संपन्न झाला. (HINDU ECONOMIC FORUM) या कार्यक्रमाचे उद्घाटन तेलंगणाचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देशभरातून आलेल्या अनेक उद्योजक, अर्थतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती.

BHANDARA ACCIDENT NEWS: लाखनी-भंडारा महामार्गावर भीषण अपघात टिप्परखाली दुचाकीस्वार ठार

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक शंखनाद आणि दीपप्रज्वलनाने झाली. या वेळी बोलताना राज्यपाल वर्मा यांनी भारताला विकसित राष्ट्रांच्या यादीत स्थान मिळवून द्यायचे असेल, तर केवळ वैयक्तिक संपत्ती नव्हे, तर सामूहिक आर्थिक प्रगती साधणं अत्यावश्यक असल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी नमूद केलं की, नैतिकता, पारदर्शकता आणि समाजहित हे तत्व घेऊन चालणारे उद्योजकच खऱ्या अर्थाने विकसित भारताचं स्वप्न साकार करू शकतात.

Illegal Gas Refilling in Nashik: नाशिकमध्ये अवैध गॅस रिफिलिंगवर मोठा छापा; १.५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

“आपण पूजा, भांगडा आणि दांडिया यापुरते मर्यादित राहू नये. आता आर्थिकदृष्ट्या बलाढ्य होण्याची वेळ आली आहे. भारताकडे बुद्धिमत्ता आणि कौशल्य अफाट आहे, पण ती एकत्र आणण्याची गरज (HINDU ECONOMIC FORUM) आहे. ती संघटित झाली, तर विकसित भारत हे स्वप्न नक्कीच साकार होईल,” असं मत वर्ल्ड हिंदू फाउंडेशनचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांनी व्यक्त केलं.

HINDU ECONOMIC FORUM:पुण्यात हिंदू इकॉनॉमिक फोरमतर्फे अर्थकारण आणि उद्योजकता या विषयावर परिषद संपन्न 

या परिषदेत विविध चर्चासत्रांद्वारे उद्योजकांनी देशातील अर्थनीती, रोजगारनिर्मिती, स्टार्टअप इकोसिस्टम यांसारख्या विषयांवर आपले विचार मांडले. बीव्हीजी ग्रुपचे संस्थापक हनुमंतराव गायकवाड यांनी त्यांच्या उद्योजकीय वाटचालीतील संघर्ष आणि यशोगाथा सांगत उपस्थितांना प्रेरणा दिली. हिंदू इकॉनॉमिक फोरमचे पुणे जिल्हाध्यक्ष गौरव त्रिपाठी यांनी संघटनेचा उद्देश सांगताना स्पष्ट केलं की, “हिंदू उद्योजकांना सर्व स्तरांवर एकत्र आणून एक सशक्त आर्थिक नेटवर्क (HINDU ECONOMIC FORUM) उभं करणं, हीच आमची दिशा आहे. यामुळे देशाच्या आर्थिक विकासात योगदान देता येईल.”

Palghar Adivasi Reservation Protest: बंजारा समाजाकडून आदिवासी आरक्षणाच्या दाव्याच्या निषेधार्थ आज पालघरमध्ये सर्वपक्षीय मोर्चा

या कार्यक्रमात “द हिंदू मॅनिफेस्टो” आणि “विकसित भारत – इंडिया 2047” या दोन पुस्तकांचे प्रकाशन देखील करण्यात आले. राज्यपाल वर्मा यांच्या हस्ते झालेल्या या प्रकाशन सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं. एकूणच, “अर्थकारण आणि उद्योजकता परिषद 2025” ही परिषद फक्त विचारांची देवाण-घेवाण नव्हे, तर विकसित भारताच्या दिशेने टाकलेलं एक महत्वाचं पाऊल ठरली.

Share This News
error: Content is protected !!