Dussehra Vehicle Sales Pune 2025: दसरा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त. या मुहूर्तावर बरेच जण सोने, घर, गाडीची खरेदी करतात. त्यात यंदाचा दसरा म्हणजे सर्व (Dussehra Vehicle Sales Pune 2025) ग्राहकांसाठी एक पर्वणीच होती. कारण केंद्र सरकारने केलेली गाड्यांवरची जीएसटी कपात आणि त्यात दसऱ्याचा शुभ मुहूर्त.
Amrut Senior Citizen Scheme: ज्येष्ठ नागरिकांसाठी केवळ ₹585 मध्ये वर्षभर मोफत एस.टी. प्रवास
दरवर्षीच दसऱ्याच्या दिवशी आणि दसऱ्याच्या पूर्व संधीला पुणेकर वाहन खरेदीला पसंती देतात पण यंदाची पसंती काही औरच ठरली आहे. यंदा हजार नाही तर टोटल (Dussehra Vehicle Sales Pune 2025) साडेनऊ हजार वाहनांची विक्री झाली आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या वाहनांची किती विक्री झाली.
MLA SANTOSH BANGAR VIRAL AUDIO CLIP: आमदार संतोष बांगर यांनी पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधीला झापलं
सर्वाधिक विक्री ही पेट्रोल मोटार सायकलची झाली 5438 मोटर सायकल या नवरात्र उत्सवात व दसऱ्याच्या दिवशी विकल्या गेल्या. तर 2554 कारस् होत्या. 69 ऑटोरिक्षा, (Dussehra Vehicle Sales Pune 2025) 361 गुड्स कॅरिअर म्हणजेच सर्व प्रकारचे टेम्पो आणि ज्यातून सामानाची नियम केली जाते अशी वाहने. 191 टूरिस्ट टॅक्सी विकल्या गेल्या. तर सतरा बस विकल्या गेल्या. 87 इतर वाहने देखील विकली गेली. एकूण 8771 पेट्रोल डिझेल आणि सीएनजी वाहनांची विक्री या नवरात्र उत्सवात व दसऱ्याच्या दिवशी झाली.
CHHATRPATI SAMBHAJINAGAR CRIME: चिमुकल्यांसमोरच वडलांची बोटं छाटली, वार केले अन्…
आता जाणून घेऊयात किती इलेक्ट्रिक वाहने विकली गेली. 679 मोटार सायकल्स, 116 कार्स, आठ टॅक्सी सात गुड्स कॅरियर्स, 4 ऑटो रिक्षा, अशी एकूण 814 इलेक्ट्रिक वाहन विकली गेली. या दसऱ्याला जीएसटी कपातीमुळे सर्वच ग्राहकांना वाहन घेण्यास फायदा झाला. व या जीएसटी कपातीचा वाहन कंपन्यांना देखील चांगलाच फायदा झालाय. हा होता पुण्यातील विकल्या गेलेल्या वाहनांचा आकडा. सर्व पुणेकरांना वेळेत वाहन मिळावेत यासाठी पुणे आरटीओने विशेष काळजी घेतली वाहनांच्या नोंदणीसाठी देखील विशेष कष्ट घेतले होते.