डॉलर घसरला- रुपया उसळला

आयात शुल्क आकारणी लांबली डॉलर घसरला- रुपया उसळला

1424 0

डॉलर घसरला: काही आठवड्यापासून ट्रम्प यांनी लागूकेलेल्या अतिरिक्त आयात शुल्कामुळे व्यवसायांमध्ये व शेअर मार्केट मधील ग्राफ मध्ये चढ-उतार चालू होता. परंतु सध्याच्या निर्णयावरून ट्रम्प यांनी चीन वगळता ६० देशांना आयात शुल्कात दिलासा दिला आहे. या देशांवर यापूर्वी लागू करण्यात आलेल्या वाढीव आयातशुल्काच्या आकारणीची अंमलबजावणी त्यांनी ९ जुलै पर्यंत स्थगिती दिली आहे. या आयात शुल्क स्थगितीनंतर भारतीय शेअर बाजारात सकारात्मक पडसाद उमटले. डॉलर घसरला रुपया उसळला अमेरिकी डॉलरच्या मूल्यात शुक्रवारी मोठी घसरण झाल्याचा फायदा भारतीय रुपयाला झाला. शेअर बाजाराच्या वाढलेल्या निर्देशांकामुळेही रुपयाला बळ लाभले ६१पैशांनी वाढलेलं रुपयाने ८६.०७ असा नवा विनिमय दर नोंदवला रुपया बुधवारी ८६.६८ वर बंद झाला होता. अमेरिकेने वाढीव आयात शुल्काच्या आकारणीच्या अंमलबजावणीस नव्वद दिवसांची स्थगिती दिल्याचे अपेक्षित सकारात्मक पडसाद शुक्रवारी दोन्ही शेअर बाजारात उमटले . अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या या निर्णयाचे गुंतवणूकदारांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले यामुळे ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ अनुक्रमे १,३१०आणि ४२९ अंकांनी वाढले. (डॉलर घसरला)

‘मेटा’ चा मोठा निर्णय; किशोरवयीन मुलांना घ्यावी लागणार पालकांची परवानगी

चंपियनने दोन दिवसापूर्वी स्थगितीचा निर्णय जाहीर केला होता परंतु गुरुवारच्या एक दिवसीय सुट्टीमुळे बाजार बंद असल्याने शुक्रवार सत्रात या निर्णयाचे पडसाद सकारात्मक स्वरूपात दिसले गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीस पसंती दिली. ट्रम्प यांच्या निर्णयाचा फायदा प्रामुख्याने धातू आणि इंधन उत्पादनासंबंधी क्षेत्रांना होणार असल्याने या समभागांना मोठी मागणी होती. याशिवाय गुंतवणूकदारांना बँकेच्या समभागात ही पसंती होती याची ही मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. सत्रांतर्गत व्यवहारात सेन्सेक्सने ७५,४६७ चा तर निफ्टी ने २२,९२३ चा टप्पा गाठला होता. मात्र सत्राच्या अखेरीस यात घट झाली सेन्सेक्समध्ये’ टाटा स्टीलचा’ समभाग सर्वाधिक म्हणजे ४.९१% वाढला एचडीएफसी बँकेचा समभाग २.३३% टक्क्यांनी वाढला ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ ‘आयसीआयसीआय बँक’ ‘भारतीय एअरटेल’ ‘कोटक महिंद्रा बँक’ ‘एनडीपीसी’, ‘अदानी पोर्ट्स’ आधी समभागांचे मूल्य ही वाढले.

व्याजदर व कर्ज हप्त्यात घट
रेपो दराचा परिणाम रिझर्व बँकेने द्वेमासिक पतधोरण जाहीर करताना रेपोदरात पाव टक्के कपात केली ,यामुळे रेपोदर आता ६% झाला आहे. यामुळे कर्जावरील व्याजदर व कर्ज हप्त्यात घट होणार आहे. बाजारावर या निर्णयाचा ही सकारात्मक परिणाम झाला.
अनेक महत्त्वाच्या कंपन्यांचे जानेवारी ते मार्च 2025 तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. या कंपन्यांची कामगिरी चांगली होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या शक्यतेमुळे ही बाजारात आश्वासक वातावरण आहे. नऊ जुलै पर्यंत बाजारातील चढ-उतार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे आता या पुढील परिस्थिती बदली का अशीच सकारात्मक राहील हे सांगणे शक्य नाही असे तज्ञांनी सांगितले आहे. सध्या तरी शेअर बाजारात उत्सव व सकारात्मकता दिसत आहे.

Share This News
error: Content is protected !!