SHARAD PAWAR HEALTH

शरद पवारांची प्रकृती स्थिर; रुग्णालयाबाहेर गर्दी न करण्याचे रोहित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

51 0

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्ष शरद पवार (SHARAD PAWAR)यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जाणवणाऱ्या शारीरिक ताणामुळे पवारांना त्रास होत होता, मात्र आता त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.

शरद पवार(SHARAD PAWAR) यांच्यावर उपचार करणारे डॉ. अभिजीत लोढा (Dr. ABHIJEET LODHA)यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, शरद पवार(SHARAD PAWAR) यांना कफाचा त्रास जाणवत होता. त्यांना पुण्याच्या (PUNE) रुबी हॉल क्लिनिकमध्ये(RUBI HALL CLINIC)दाखल केल्यानंतर सर्व आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत.

बारामतीमध्ये (BARAMATI) असताना त्यांना खोकल्याचा त्रास वाढल्याने तातडीने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये (PUNE RUBI HALL CLINIC) आणण्यात आले होते. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे(SUPRIYA SULE) , प्रतिभा पवार(PRATIBHA PAWAR)आणि रोहित पवार(ROHIT PAWAR) देखील उपस्थित आहेत

दरम्यान, शरद पवार(SHAEAD PAWAR)रुग्णालयात असल्याची बातमी समजताच कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. “साहेबांची प्रकृती आता उत्तम आहे, डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. मात्र, रुग्णालयात इतर रुग्णांना कोणताही त्रास होऊ नये आणि साहेबांना पुरेशी विश्रांती मिळावी, यासाठी कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी करू नये,” अशी विनंती रोहित पवार (ROHIT PAWAR) यांनी केली आहे. पवारांची प्रकृती सुधारत असून लवकरच ते पुन्हा सक्रिय होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Share This News
error: Content is protected !!