Liver Tips

Liver Tips : ‘या’ 5 गोष्टी यकृतासाठी ठरतात फायदेशीर; रक्तदेखील करतात शुद्ध

591 0

यकृत हा (Liver Tips) शरीरातील एक महत्त्वाचा भाग आहे. यकृत (Liver Tips) शरीराला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. अन्न पचवण्यात यकृताची महत्वाची भूमिका असते. ज्यांचे यकृत नीट काम करत नाही अशा लोकांना पचनाच्या समस्या सतत होत असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यकृत रक्त स्वच्छ करण्याचे आणि संपूर्ण शरीराला पोषक द्रव्ये पोहोचविण्याचे काम करते. जर तुम्हाला यकृताशी संबंधित समस्या असतील तर तुमच्या खाण्याच्या सवयींची खूप काळजी घ्यावी लागते. यामुळे आज आपण आपले यकृत निरोगी ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत हे पाहणार आहोत…

लसूण
ज्यांचे यकृत कमकुवत आहे त्यांनी लसूण जरूर खावे. लसूण खाल्ल्याने यकृतातील एन्झाइम सक्रिय होतात, त्यामुळे यकृत स्वच्छ राहते. लसणामुळे यकृत मजबूत होते.

लिंबू
लिंबू यकृतासाठीही फायदेशीर आहे. लिंबूमध्ये डी-लिमोनेन नावाचे घटक आढळतात जे यकृताच्या पेशी सक्रिय करतात. यामुळे यकृत स्वच्छ होते. लिंबू पाणी रोज पिणे यकृतासाठी फायदेशीर आहे.

ग्रीन टी
यकृत मजबूत करण्यासाठी, दररोज ग्रीन टी प्या. यामुळे चरबी कमी होते आणि शरीर डिटॉक्स होते. ग्रीन टी यकृताला हानिकारक प्रभावापासून वाचवण्याचे काम करते.

हळद
यकृत स्वच्छ करण्यासाठी हळदीचा वापर करा. हे यकृत डिटॉक्स करण्यास मदत करते. तसेच चरबीचे पचन होण्यास मदत होते. 1/4 चमचे हळद पावडर एका ग्लास पाण्यात मिसळा. आता हे पाणी उकळून प्या.

बीटरूट
यकृत स्वच्छ करण्यासाठी आणि यकृत निरोगी करण्यासाठी बीटरूट खा. बीटरूटमध्ये बीटा कॅरोटीन असते जे यकृताला उत्तेजित करण्याचे काम करते. यामुळे यकृताची कार्य क्षमता सुधारते.

(टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. काही करण्याअगोदर एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

Share This News

Related Post

हृदयविकाराचा धोका स्त्रियांपेक्षा पुरुषांना का असतो ? जाणून घ्या कारणं

Posted by - July 6, 2022 0
आजची जीवन जगण्याची पद्धत ही पूर्वीपेक्षा खूप वेगळी आहे आणि त्यात शहरीभागातील तर अजुनच वेगळी आहे. आजच्या धावत्या युगात बहुतांश…

जेवणानंतर फेरफटका मारणं पचनक्रियेसह मधुमेहींसाठीही उपयोगी

Posted by - June 7, 2022 0
जेवल्यानंतर थोडा वेळ फिरणे किंवा चालणे ही बहुतांश भारतीयांच्या सवयींपैकी एक आहे. त्यामुळे पचन क्रिया सुधारते असा अनेकांचा विश्वास आहे. पण…

लतादीदींनी ज्या न्युमोनियाशी झुंज दिली तो वयोवृद्धांसाठी किती घातक आहे ? जाणून घ्या

Posted by - February 7, 2022 0
कोरोना काळात मोठ्या प्रमाणात लोकांना न्यूमोनियाचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी तर कोविडमधून बरे झालेले रुग्ण नंतर न्यूमोनियाचे बळी ठरल्याचीही…
Summer Health Tips

Summer Health Tips : उन्हाळ्यात शरीराला आहारापेक्षाही जास्त असते ‘या’ गोष्टींची गरज

Posted by - March 30, 2024 0
उन्हाळा सुरु झाला आहे. बऱ्याच जणांना उन्हाळ्यात वेगवेगळे त्रास होतात. जसं की उन्हाळी लागणे, फारच गरम होणे, फार घाम येणे,…
Thyroid Tips

Thyroid Tips : ‘या’ घरगुती उपायांनी करा थायरॉईडवर मात; त्रास होईल कमी

Posted by - September 7, 2023 0
चुकीची दिनचर्या, अचकळ-पचकळ खाणे आणि तणाव यामुळे शरीरात अनेक आजार घर करतात. यापैकी एक म्हणजे थायरॉईड (Thyroid Tips). या आजाराचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *