लोखंडासारख्या मजबूत हाडांसाठी खा ‘हा’ उपवासाचा पदार्थ

142 0

आजकाल प्रोटीन पावडर घेण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. जिमला जाणारे अनेक लोक व्यायाम केल्यानंतर प्रोटीन पावडरचा वापर लगेच करायला सुरुवात करतात. पण तुम्हाला माहिती आहे का? आपल्या उपवासातील पारंपरिक पदार्थांमध्येच असा एक पदार्थ आहे जो प्रोटीन पावडरपेक्षा खूपच फायदेशीर आहे.

हा आहे तो उपवासाचा पदार्थ!

हा पदार्थ म्हणजे भगर. भगरला वेगवेगळ्या भागांमध्ये वरी तांदूळ किंवा समा तांदूळ असेही म्हणतात. ज्यांना शरीरात प्रोटीनची कमतरता आहे, त्यांच्यासाठी भगर म्हणजे वरदानच आहे. हा पदार्थ फक्त हाडे मजबूत करत नाही, तर यामध्ये प्रोटीन, लोह आणि कॅल्शियमसारखी पोषणमूल्ये ही भरपूर प्रमाणात असतात.

भगर खाण्याचे फायदे

•शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवतो

भगर खाल्ल्याने शरीरातील शुगर लेव्हल नियंत्रित राहते. मधुमेह असलेल्या लोकांसाठी हा पदार्थ खूप उपयुक्त आहे.

•मानसिक शांतता आणि ताण कमी करतो

भगरमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते, जे मानसिक शांतता देते. यामुळे ताण कमी होतो आणि मेंदूची कार्यक्षमता सुधारते.

•हृदयासाठी लाभदायक

भगरमध्ये असलेले मॅग्नेशियम हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. हृदयाशी संबंधित आजार टाळण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी भगर मदत करते.

•हाडे मजबूत बनवतो

भगरमध्ये असलेले प्रोटीन आणि कॅल्शियम हाडांना मजबूत बनवतात, ज्यामुळे शरीराला आवश्यक आधार मिळतो.

महागड्या प्रोटीन पावडरऐवजी आपल्या पारंपरिक आणि पोषणमूल्यांनी समृद्ध अशा भगरचा आहारात समावेश करा. हा पदार्थ आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असून तो नैसर्गिक पद्धतीने शरीराला पोषण देतो.

भगर हा साधा, परंतु अत्यंत पौष्टिक पदार्थ आहे. याला आपल्या उपवासाच्या आहाराचा भाग बनवा आणि त्याचे आरोग्यासाठी होणारे अपार फायदे मिळवा.

Share This News

There are 1 comments

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!