शिक्षणाची चळवळ आणि मोहीम मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे – रामदास आठवले

202 0

पुणे: दलीत बहुजन समाजाचा विकास साधायचा असेल तर सर्वप्रथम शिक्षणाची चळवळ आणि मोहीम झोपडपट्टी आणि दलीत वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणत राबवली पाहिजे आणि तेच महान कार्य महात्मा फुले ,सावित्रीबाई फुले, महर्षी शिंदे यांनी केले होते .आणि हा वारसा आज शेवाळे परिवार मोठ्या हिंमतीने आणि जिद्दीने चालवत असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले .

ते महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी 1852 ला देशात पहिली शाळा सुरू केली त्याला 170 वर्ष पूर्ण झाल्याने सावित्रीबाई फुले ग्रंथालय व ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते आणि डी.सी.एम संस्थेचे माजी अध्यक्ष एम.डी.शेवाळे यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण आठवले यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते .

पुढे ते म्हणाले की ,एम.डी.शेवाळे यांनी फुले ,आणि महर्षी शिंदे यांचा शैक्षणिक वारसा चालवत होते .झोपडपट्टी आणि दलीत समाजाला सेवाभावी वृत्तीने शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले आहे .

या कार्यक्रमाचे आयोजन डिप्रेस्ड क्लासेस मशीन या संस्थेच्या वतीने करण्यात आले होते .यावेळी संस्थेचे सचिव विशाल शेवाळे ,अध्यक्ष डि. टी.रजपूत ,आमदार सुनील कांबळे,माजी नगरसेवक अविनाश बागवे ,अजय भोसले ,राष्ट्रवादी पक्षाचे शहाध्यक्ष प्रशांत जगताप तसेच विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!